महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम : खान्देशासाठी असा आहे अंदाज

Heavy rains continue in Maharashtra: This is the forecast for Khandesh मुंबई (11 सप्टेंबर 2025) : आजपासून पावसाचा चार दिवस ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम राहणार असून कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा जोर राहील, अशी शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस होईल तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व परभणी जिल्ह्यांनाही सरींचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, खान्देशातातील धुळ्यासह जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.
असा आहे आयएमडीचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 12 ते 16 सप्टेंबर या कालावधीत राज्यात पावसाची तीव्रता कायम राहील. कोकण व गोव्यात सलग पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर मुंबईत अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळतील.
मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, शेतकर्यांनी शेतीसंबंधी नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वदर्भात नागपूर, अमरावती व अकोला जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील लातूर, हिंगोली व संभाजीनगर जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढेल.
सप्टेंबर महिन्यातील या पावसामुळे खरीप हंगामावर महत्त्वपूर्ण परिणाम होणार आहे. पावसामुळे धान, सोयाबीन, कापूस व मका या पिकांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, अतिवृष्टी झाल्यास पिकांचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे.
मराठवाड्यातील काही भागात आधीच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, तिथे झालेला पाऊस शेतकर्यांसाठी दिलासादायक ठरेल. कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत असून, काही खालच्या भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्य प्रशासनाने सर्व जिल्हाधिकार्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
सोलापूर शहरात बुधवारी पहाटे दमदार पाऊस झाला. मध्यरात्री 2 ते पहाटे 5.30 पर्यंत पाऊस सुरू होता. या अडीच तासांच्या काळात तब्बल 37.4 मिलिमीटर पाऊस बरसल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली. तसेच रात्री बाराच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. तो रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
दरम्यान, आजपासून चार दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आजही दमदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. मध्यरात्रीनंतर वातावरणात बदल होऊन पहाटेच्या सुमारास पावसास सुरूवात झाली. हा पाऊस शहरात सर्वत्र होता. शिवाय शहर परिसरातही बरसला. पाऊस आल्याने बुधवारी कमाल तापमानात 2.3 अंशाने घटून 32.6 अंश सेल्सिअसची नोंद झाली.
