भुसावळातील फालक परिवाराने घेतली आजीवन ‘मांसाहार त्यागा’ ची शपथ


The Falak family of Bhusawal took a lifelong vow to ‘renounce meat eating’ भुसावळ (11 सप्टेंबर 2025) : शहरातील चक्रधर नगरातील जैन स्थानक गादिया पौषध शालामध्ये श्रुतधर आचार्य प.पु.प्रकाश मुनीजी म.सा.यांच्या आज्ञानुवर्ती जैन साध्वी खुशालीजी म.सा.आदी ठाणा चार यांचा चातुर्मास चालू आहे. या चातुर्मासात शहरातील सुशिक्षित, सुसंस्कृत धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रांमध्ये नावलौकिक असलेले व तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत असलेले विजय फालक व त्यांचे कुटुंबीय यांनी साध्वींच्या प्रेरणेने तहहयात मांसाहार करणार नसल्याची शपथ घेतली.

19 वर्षीय तरुण युवक व जयलक्ष्मी अकॅडमीचे संचालक जय फालक याने आजन्म मदिरा सेवन, धूम्रपान, गुटखा, तंबाखू, हुक्का सेवन, जुगार या गोष्टी सुद्धा करणार नाही याची सुद्धा स्वतःहून साध्वीजिंकडे इच्छा व्यक्त करून शपथ घेतली.


लावण्या फालक ही युवती बाहेर शहरात एम.बी.ए.चे उच्च शिक्षण घेते. तिने सुध्दा मांसाहार त्याग करुन युवती पुढे आदर्श ठेवला. साध्वीजींनी या कुटुंबाला मनापासून धन्यवाद देऊन त्यांनी घेतलेल्या अशक्यप्राय गोष्टींची शपथ याविषयी मार्मिक विवेचन केले. त्यांना या बाबींचे महत्व पटवुन दिले.

आज युवक वर्ग हा अध:पतनाकडे भरकटत चालला आहे. फालक कुटुंब व भावा बहिणींनी मात्र या सर्व कुव्यसनापासून फारकत घेतल्याने त्यांची प्रशंसा करण्यात आली. आपण हा वारसा पुढे सुद्धा चालवणार असून अनेकांना या गोष्टीपासून प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करू व मी स्वामी समर्थांची भक्त असूनन त्यांच्याच कृपेने हे घडुन आले असावे, असे विद्यार्थी प्रिय ताप्ती पब्लिक स्कूलच्या शिक्षिका, सुसंस्कारीत कुटुंब नायीका पूनम फालक यांनी मानस व्यक्त केला.त्यांच्या या कृती मागे ज्येष्ठ सुश्राविका व स्वाध्यायी शोभा ललवाणी यांची प्रेरणा होती.

कठोर निर्णयाबद्दल सर्वत्र अभिनंदन
शोभा ललवाणी यांनी सुद्धा या कुटुंबाचे आभार व्यक्त केले की त्यांनी इच्छेचा मान राखून हा दृढ संकल्प केला. त्यांच्या या अध्यात्मिक बाबीचे व कठोर निर्णय धारण केल्याबाबत जेष्ठ सुश्रावक व जैन कॉन्फरन्सचे प्रेमभाऊ कोटेचा, चातुर्मास समिती अध्यक्ष, टॅक्स कन्सल्टंट प्रशांत कोटेचा, आनंद ड्रेसचे संचालक सुनील कोटेचा, सोसायटी साडी सेंटरचे हेमंत मंडलेचा, कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी, डॉ.संजय गादिया, विजय गादिया, दिनेश संचेती, मदनलालजी ललवाणी, शिवसेना नेते ललित मुथा, प्रा.आर टी.सुराणा, डॉ.संदीप कोटेचा, सचिन डेलीवाल, पारस नाहाटा, ज्योती गादिया, संगीता मुगदिया, मंगला कोटेचा आदींनी स्तुत्य निर्णयाचे कौतुक केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !