सोशल मिडीयावरून ओळख ; भेटण्यास नकार दिल्यानंतर तरुण विवाहितेच्या अपार्टमेंट शिरला : त्रास असह्य झाल्याने विवाहितेने स्वतःला संपवले


Nashik’s married woman ends life after being pressured to meet नाशिक (11 सप्टेंबर 2025) : सोशल मिडीयावरून ओळख झाल्यानंतर विवाहितेला सातत्याने वारंवार फोन करून ‘मला भेटण्यासाठी ये’असा तगादा लावल्याने विवाहितेने आत्महत्या केली तर या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नाशिकमध्ये ?
नाशिक चांडक सर्कल भागात मयत विवाहिता पतीसह वास्तव्यास होती. विवाहितेच्या पतीच्या फिर्यादीनुसार, उमेश भवर (पूर्णनाव व पत्ता नाही) हा गेल्या तीन महिन्यांपासून चांडक सर्कल परिसरातीलएका 30 वर्षीय विवाहितेस फोन करून छळत होता. सोशल मीडियावरील ओळखीतून त्याने फोन नंबर मिळवल्याचा संशय व्यक्त आहे. वारंवार फोन करून ‘मला भेटायला ये’ असा तगादा लावत असताना विवाहिता त्याला भेटण्यास नकार देत होती. 25 ऑगस्ट रोजी संशयित उमेशने विवाहितेला पहाटे फोनकरून भेटायला येण्यासाठी आग्रह धरला.



फोन टाळल्यावर मेसेज करून भेटण्यासाठी जबरदस्ती केली. विवाहिता त्याला भेटायला गेली नाही म्हणून उमेशने तिच्या घरी येण्याची धमकी दिली. त्यास ‘बिल्डिंगमध्ये येऊ नकोस’, असे सांगूनही उमेशने थेट बिल्डिंगमध्ये येत गोंधळ घातला. यातून विवाहिता नैराश्यात गेली. उमेशकडून सतत होणार्‍या या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून तिने 25 ऑगस्टलाच 12 वाजता गळफास घेत आत्महत्या केली.

पोलिसांनी केलेल्या तपासात संशयित उमेश भवरचा मोबाइल क्रमांक मुलीच्या नावाने दाखवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस त्याच्या मोबाइल क्रमांकावरून शोध घेत असून विवाहितेच्या फोनवरूनही माहिती घेतली जात असल्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय गोडे करत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !