चोरीच्या उद्देशाने फिरताना पाचोर्‍यातील त्रिकूटाला अटक


Trio of five arrested while roaming for theft जामनेर (11 सप्टेंबर 2025) : जामनेर तालुक्यातील शेगोळा गावात मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी तीन अनोळखी तरुण शेती शिवारात संशयास्पद फिरताना दिसल्याने ग्रामस्थांनी फत्तेपूर पोलिसांच्या मदतीने तिघांना पकडले. तिघे संशयीत चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलिस तपासात समोर आलेले आहे.

तिघा संशयीतांना अटक
शेगोळा गावात मंगळवार. 9 सप्टेबरच्या रात्री संशयीत शाहरूक रज्जाक तडवी (22), अयन्नोदीन अब्बास तडवी (26), मयूर विठ्ठल माळी (18, तिघे रा.कोल्हे, ता.पाचोरा) यांना दुचाकीवरून फिरताना ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर संशय आला व रात्रीच फत्तेपूर पोलिस ठाण्याचे एपीआय अंकुश जाधव यांना माहिती कळवली.



अंकुश जाधव यांनी तत्परता दाखवून पोलिस पथकासह घटनास्थळी येत तिघा संशयीतांना ताब्यात घेतले. संशयीतांकडे इलेक्ट्रीक वायरी व झटका मशीन, चोरी करण्यासाठी वापरले जाणारे कटर मिळाले आणि चोरी करण्याच्या हेतुने आल्याची तिघांनी कबूली दिली. त्यांच्याकडे 18 इंच लांब लोखंडी पात्यांचे कटर त्यांच्या अंदाजे किंमत 500 रुपये, तिघांकडे सात हजारांची रोकड, तीन मोबाईल तसेच एक 20 हजार रुपये किंमतीची हिरोहोडा (एम.एच.-19 ए टी.-9584) मोटार सायकल मिळून एकूण 43 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे. कॉन्स्टेबल निलेश राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर राठोड, संदीप पाटील, निलेश राठोड करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !