शिरपूर तालुक्यातील ग्रामरोजगार साहाय्यकांचा प्रशिक्षणावर बहिष्कार ; कामबंद आंदोलनाला वेग

शिरपूर (12 सप्टेंबर 2025) : शिरपूर तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 सप्टेंबरपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन अधिक तीव्र केले आहे. 11 सप्टेंबर 2025 रोजी पंचायत समिती कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमावर ग्रामरोजगार सहाय्यकांनी बहिष्कार टाकत गेटवर घोषणाबाजी करून शासनाचा निषेध व्यक्त केला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणार्या ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यामध्ये विशेषतः 3 ऑक्टोबर 2004 रोजीच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. याबाबतचे निवेदन शिरपूर गटविकास अधिकार्यांना 1 सप्टेंबर रोजी संघटनेच्या वतीने देण्यात आले होते. मात्र शासनाने अद्याप कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे ग्रामरोजगार सेवक आक्रमक झाले आहेत.
कामबंद आंदोलनामुळे तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सर्व कामे ठप्प झाली आहेत. अशा स्थितीतही शिरपूर गटविकास अधिकार्यांनी विविध कामांसाठी 11 सप्टेंबर रोजी प्रशिक्षण आयोजित केले होते. परंतु, ग्रामरोजगार साहाय्यकांनी सभागृहात प्रवेश न करता सरळ गेटवर घोषणाबाजी सुरू केली आणि प्रशिक्षणावर बहिष्कार टाकत आंदोलन सुरूच ठेवले.असून जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरू राहील.या निर्णयावर ठाम आहेत.
या आंदोलनामुळे शासनाच्या ग्रामीण विकासविषयक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून शासनाने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. या आंदोलनावेळी शिरपूर तालुक्यातील सर्वच ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
