भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात पोलिस भरतीवर कार्यशाळा


भुसावळ (12 सप्टेंबर 2025) : भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवार, 12 रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस भरती मार्गदर्शन कार्यशाळा- 2025 आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.जी.आर.वाणी होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा.डॉ.चंद्रकांत सरोदे, प्रमुख वक्तया प्रा.प्रणिता राणे, प्रा.नेहा महाजन, प्रा.डॉ.स्वाती महाजन, प्रा.डॉ.दीनानाथ पाठक उपस्थित होते. पोलिस भरतीसाठी तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदर कार्यशाळा आयोजित केली होती.


उपप्राचार्य प्रा. डॉ.जी.आर.वाणी यांनी विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा अधिकाधिक लाभ घेण्यासह पोलिस भरती परीक्षा पास व्हावे, असे आवाहन यावेळी केले. कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ.डी.एन.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यशाळेस अंक गणित या घटकावर प्रा.प्रणिता राणे, बुद्धिमत्ता चाचणी प्रा.नेहा महाजन, मराठी व्याकरण घटकावर प्रा.डॉ.स्वाती महाजन आणि प्रा.डॉ.दीनानाथ पाठक यांनी मार्गदर्शन केले.

प्रा.डॉ.संगीता भिरुड व प्रा.वंदना महाजन उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रा.डॉ.चंद्रकांत सरोदे तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.स्वाती महाजन यांनी केले. कार्यशाळेस महाविद्यालयातील सर्व प्राद्यापकांचे सहकार्य लाभले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !