रोटी का कर्ज चुकाना है म्हणत सोनू सुदचा पंजाब पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात !


Roti Ka Karj Chukana Hai, Sonu Sud’s helping hand for the Punjab flood victims! नवी दिल्ली (13 सप्टेंबर 2025) : कोरोना काळातील मदत कार्यामुळे देशभरातील नागरिकांच्या गळ्यातील ताईत झालेला सोनू सुद पुन्हा चर्चेत आला आहे तो पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सढळ हाताने केलेल्या मदतीनंतर ! पंजाबमध्ये पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने पूरग्रस्तांसाठी पुढाकार घेत मदतीचा हात दिला आहे. अभिनेता सध्या पंजाबमध्ये असून पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करत आहे. बोटीतून घरोघरी जाऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला. ‘रोटी का कर्ज चुकाना है’ असं म्हणत तो मदत करत आहे.

व्हिडिओद्वारे दिली माहिती
सोनू सूदने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर केला आहे. ‘मेरा पंजाब’ असं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. अभिनेत्याने पंजाबच्या काही पूरग्रस्त गावांना भेट दिली. व्हिडिओमध्ये सोनू म्हणतो की, आज आम्ही सकाळपासून अनेक गावांना भेट दिली आहे आणि जेव्हा आम्ही एखाद्या कुटुंबाच्या घरात जातो तेव्हा ते आम्हाला जेवणाबद्दल विचारतात, तु्म्ही चहा किंवा दूध पिणार का असं आपुलकीने विचारतात.


एकत्र येऊन काम करायचे आहे
जो शेतकरी आपल्याला चपाती, भाकरी देतो… संपूर्ण देशाला देतो, त्या शेतकर्‍याचं पीक या पाण्याखाली आहे. हे पाणी वाहून जाईल, ते कमी होईल, पण त्यांच्यासाठी जे आवश्यक आहे त्या गरजा वाढतील. म्हणून आपल्याला एकत्र येऊन यांच्यासाठी काम करायचं आहे. आपल्यावर असलेलं हे कर्ज आपल्याला फेडावं लागेल.

सोनू सूद हा त्या मोजक्या सेलिब्रिटींपैकी एक आहे जे नेहमीच सामाजिक कार्यात पुढे राहतो. कोरोना महामारीच्या काळात जेव्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आणि हजारो कामगार वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकले होते, तेव्हाही सोनू सूदने लोकांना मदत केली आणि हजारो लोकांना त्यांच्या घरी सुखरूप पाठवलं. तेव्हापासून लोक त्याला देवदूत म्हणतात.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !