जीएसटीतील बदलानंतर हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी समोर : लाईफबॉय साबण, डव शाम्पू, टूथपेस्ट झाली स्वस्त

Hindustan Unilever products become cheaper after GST rate change मुंबई (13 सप्टेंबर 2025) : जीएसटी दरातील कपातीमुळे सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. त्यातच सामान्य ग्राहकांच्या दररोजच्या वापराच्या वस्तू स्वस्त झाल्या असून देशातील सर्वात मोठी कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरने शाम्पूपासून ते कॉफीपर्यंतच्या किंमतींवर कपात जाहीर केली. लवकरच ही नवीन किंमतीतील उत्पादने दुकानांपर्यंत पोहोचणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
वस्तू झाल्या स्वस्त
कंपनीने एका वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत डव, क्लिनिक प्लस, सनसिल्क शाम्पूसह लाईफबॉय, लक्स साबण, क्लोजअप टुथपेस्ट, हॉर्लिक्स, ब्रू सारख्या उत्पादनांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. ही कपात 5 रुपयांपासून ते 50-60, 90 रुपयांपर्यंत आहे.

अशा वस्तू झाल्या स्वस्त
340 मिली डव्ह शॅम्पूची बाटली 490 रुपयांवरून 435 रुपयांवर येईल.
हॉर्लिक्सच्या 200 ग्रॅम जारची किंमत 130 रुपयांवरून 110 रुपयांवर येईल.
200 ग्रॅम किसान जॅम 90 रुपयांवरून 80 रुपयांना उपलब्ध होईल.
75 ग्रॅम लाईफबॉय साबणाची किंमत आता 60 रुपयांवर येईल, जी पूर्वी 68 रुपयांवर होती.
क्लिनिक प्लस 355 मिली शॅम्पू 393 रुपयांवरून 340 रुपयांवर येईल.
सनसिल्क ब्लॅक साइन शॅम्पू 350 मिली ची किंमत 430 रुपयांवरून 370 रुपयांवर येईल.
डव्ह सीरम 75 ग्रॅमची किंमत 45 रुपयांवरून 45 रुपयांवर येईल.
लाइफबॉय साबण (75 ग्रॅम द 4) 60 रुपयांना उपलब्ध असेल.
लक्स साबण (75 ग्रॅम द 4) 96 रुपयांवरून 85 रुपयांना उपलब्ध होईल.
क्लोजअप टूथपेस्ट (150 ग्रॅम) 145 रुपयांवरून 129 रुपयांना उपलब्ध होईल.
लॅक्मे 9 ते 5 पीएम कॉम्पॅक्ट 9 ग्रॅम 675 रुपयांवरून 599 रुपयांवर कमी करण्यात आले आहे.
किसान केचप (850 ग्रॅम) 100 रुपयांवरून 93 रुपयांवर कमी करण्यात आले आहे.
हॉर्लिक्स वुमन 400 ग्रॅमची किंमत 320 रुपयांवरून 284 रुपयांवर कमी करण्यात आली आहे.
ब्रू कॉफी 75 ग्रॅमची किंमत 300 रुपयांवरून 270 रुपयांवर कमी करण्यात आली आहे.
नॉर टोमॅटो सूप 67 ग्रॅमची किंमत 65 रुपयांवरून 55 रुपयांवर कमी करण्यात आली आहे.
बूस्ट 200 ग्रॅमची किंमत 124 रुपयांवरून आता 110 रुपये करण्यात आली आहे.
