कासोदा पोलिसांची मोठी कारवाई : गुटखा तस्कर लाखाच्या गुटख्यासह जाळ्यात


Kasodya vendor caught with gutkha worth lakhs कासेदा, ता.एरंडोल (13 सप्टेंबर 2025) : कासोदा गावातील गुटखा तस्कराला कासोदा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे वाहनासह ताब्यात घेतले आहे. इको वाहनातून सुमारे एक लाखांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत. विजय शिवाजी वारे (कासोदा, ता.एरंडोल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
कासोदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निलेश राजपुत यांना एका वाहनाद्वारे गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर 11 रोजी गालापूर रोडवर पाटचारीजवळ खडके फाट्यावर सायंकाळी 5.30 वाजेचे सुमारास गालापूर, ता.एरंडोल रोडने कासोदा गावाकडे जाणारी मारुती कंपनीची इको चारचाकी (वाहन एम.एच.24 व्ही.3361) आल्यानंतर तिची झडती घेतली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला व सुगंधित तंबाखू आढळल्याने वाहनासह चालकाला ताब्यात घेण्यात आले. अन्न सुरक्षा अधिकारी विजय शिवाजी वारे यांच्या उपस्थितीत तपासणी केल्यानंतर एक लाख 10 हजार 460 रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट सुपारी व सुगंधित तंबाखु तसेच दोन लाख रुपये किंमतीचे वाहन मिळून तीन लाख 10 हजार 460 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


यांनी केली कारवाई
जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, चाळीसगाव अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा सहाय्यक निरीक्षक निलेश राजपुत, नाईक अकिल मुजावर, कॉन्स्टेबल समाधान तोंडे, कॉन्स्टेबल प्रशांत पगारे, कॉन्स्टेबल कुणाल देवरे, कॉन्स्टेबल योगेश पाटील आदींच्या पथकाने केली. तपास सहा.निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !