रामानंद पोलिसांची कामगिरी : गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करणार्याला बेड्या

Terror in Jalgaon over threat of village pistol; Dadu arrested जळगाव (13 सप्टेंबर 2025) : गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करणार्या संशयीताला रामानंद पोलिसांनी अटक केली. महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे (जळगाव) असे आरोपीचे आव आहे. आरोपीकडून जिवंत काडतूस व 20 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रामानंद नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना पिंप्राळा परिसरातील सराईत गुन्हेगार महेंद्र उर्फ दादू सपकाळे हा हुडको परिसरात गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली होती व आरोपीच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांनी आपली दुकाने बंद केली.

पोलिसांना माहिती कळताच पथकाने धाव घेतली व संशयीत महेंद्र पिंप्राळा रोडकडे पळू लागला. खंडेराव नगरकडे पळत असताना पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेत 20 हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. आरोपी महेंद्र उर्फ दादू सपकाळे याच्यावर यापूर्वी रामानंद नगर पोलिस ठाण्यात एकूण पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, रामानंद पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सचिन रणशेवरे, हवालदार जितेंद्र राजपुत, सुधाकर अंभोरे, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, योगेश बारी, विनोद सुर्यवंशी आणि गोविंदा पाटील आदींनी केली. तपास फौजदार सचिन रणशेवरे करीत आहेत.
