शिरपूर तालुका खुनाने हादरला : अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या ; आरोपींना बेड्या


Shirpur taluka shaken by murder : Youth murdered over immoral relationship ; Accused arrested शिरपूर (13 सप्टेंबर 2025) : पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून पतीनेच मित्राला सोबत घेत 26 वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना शिरपूर तालुका पोलिस ठाणे हद्दीतील तेल्यामहू येथे घडले मात्र अवघ्या 24 तासात शिरपूर तालुका पोलिसांनी गुन्ह्याची उकल करीत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या.

नानासिंग साहेज्या पावरा (26, तेल्यामहु पो.कोडीद, ता.शिरपूर जि.धुळे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे तर मुकेश रुपसिंग पावरा (रा.तेल्यामहु, पो.कोडीद, ता.शिरपूर) व बागलसिंग नानुराम पावरा अटकेतील आरोपींचे नाव आहे.


काय घडले शिरपूर तालुका हद्दीत
शिरपूर तालुका हद्दीतील तेल्यामहु गावाच्या नाल्याजवळ एका तरुणाचा निर्घृण खून करून मृतदेह फेकण्यात आला मात्र तपासात हा मृतदेह नानासिंग साहेज्या पावरा (26, तेल्यामहु पो.कोडीद, ता.शिरपूर, जि.धुळे) असल्याचे निष्पन्न झाले व मयताचा भाऊ लक्ष्मण सोहज्या पावरा यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आाल.

चाकूचे वार करीत संपवले
पोलिसांना तपासादरम्यान मयत नानासिंग पावरा याचे मुकेश पावराच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली होती व संशयीताला ताब्यात घेतल्यानंतर त्याने मात्र कानावर हात ठेवले तर एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या माहितीवरुन व मुकेश पावरासोबतचा गुन्ह्यात सहभागी असलेला आरोपी बागलसिंग नानुराम पावरा याला विचारपूस केल्यानंतर व उत्तरे देताना तो गोंधळल्याने त्यास पोलिसांनी बोलते करताच त्याने खुनाची कबुली देताच दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपींनी चाकूचे वार करीत मृतदेह टाकून दियाची कबुली दिली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, पोलिस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, फौजदार मिलिंद पवार, सुनील वसावे, मनोज कचरे, हवालदार संजय चव्हाण, हवालदार संदीप ठाकरे, हवालदार रमेश माळी, हवालदार राजू ढिसले, मोहन पाटील, रणजीत वळवी, योगेश मोरे, संजय भोई, सुनील पवार, धनराज गोपाळ, स्वप्निल बांगर, विजय ढिवरे, कृष्णा पावरा आदींच्या पथकाने केली. तपास फौजदार मिलिंद पवार करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !