वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणत असतील तर आपणही म्हणायचे ! : नितीन गडकरींचे वक्तव्य चर्चेत

If seniors were calling a donkey a horse, we would have called it that too !: Nitin Gadkari’s statement in discussion नागपूर (14 सप्टेंबर 2025) : वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणत असतील तर आपणही म्हणायचे कारण वरिष्ठ हे नेहमीच बरोबर असतात, असे वक्तव्य नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर येथे इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या वार्षिक परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. यावेळी त्यांनी सरकार व प्रशासकीय कार्यपद्धत्तीवर टीका केली.
काय म्हणाले नितीन गडकरी
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध असून नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर येथे इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या वार्षिक परिषदेतही त्यांनी सरकारी कामाच्या पद्धतीचा एक किस्सा सांगितला. त्यात गडकरी म्हणाले, आपल्याकडे जर वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले, तर आपणही घोडाच म्हणायचे कारण वरिष्ठ नेहमीच बरोबर असतात.
पुढे गडकरी म्हणाले की, सरकारी पद्धतीत आजूृ- बाजूला बघायचे नाही, वरिष्ठ बोलतात तसेच करण्याची पद्धत आहे. वरिष्ठांनी गाढवाला घोडा म्हटल्यास, आपणही घोडाच म्हणायचे अशी पद्धत असल्याचेही गडकरी म्हणाले. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे बांधलेल्या मुंबईतील सह्याद्री अतिगृहातील कामाची मात्र गडकरींनी प्रशंसा केली. गडकरी म्हणाले, ताजमहल सदृष्यसुंदर वास्तू मुंबईत सह्याद्री अतिगृहाच्या रुपात बांधली गेली आहे. आजही ही इमारत मुंबईतील चांगल्या वास्तूपैकी एक आहे. विकसीत भारतासाठी या पद्धतीच्या चांगल्या वास्तू व्हायला हव्या, असेही गडकरी म्हणाले.
यांची होती विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर याप्रसंगी मंचावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, आयबीसीचे अध्यक्ष सी.देबनाथ, आय.बी.सी.राज्य अध्यक्ष सुभाष चांदसुरे, आय.बी.सी.चे राष्ट्रीय अध्यक्ष चिन्मय देबनाथ, व्ही.आर.बन्सल, सचिव व्ही.आर.बन्सल, उपाध्यक्ष अविनाश गुल्हाने उपस्थित होते.
