दारूच्या धुंदीत तेलात पडून तरुणाचा मृत्यू
Young man dies after falling into oil under the influence of alcohol नागपूर (15 सप्टेंबर 2025) : दारूच्या धुंदीत तेलात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगरधन घडली. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केल. आहे. प्रशांत कुंवरलाल मसुरके (25) असे मृताचे नाव आहे.
घटनेच्या दिवशी शनिवारी प्रशांत नगरधन येथील आठवडी बाजारात गेला होता. याठिकाणी तो दारुच्या नशेत असल्याने तोल जाणून उकळत्या तेलाच्या कढईत पडला. यात गंभीर झालेल्या प्रशांतचा दुसर्या दिवशी रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.





