दादरमध्ये ठाकरे गट आक्रमक : माँ साहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकला


Thackeray group aggressive in Dadar : Paint thrown on Maa Saheb Meenatai Thackeray’s statue दादर (17 सप्टेंबर 2025) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या मुंबईतील दादर शिवाजी पार्क परिसरात असलेल्या पुतळ्यावर अज्ञाताने रंग टाकल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झालाआहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवाजी पार्क परिसरामध्ये शिवसैनिक आणि ठाकरे गटाचे नेते दाखल झाले. त्यानंतर पुतळ्याची स्वच्छता करून घेण्यात आली असून, अज्ञात समाज कंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे.






मुंबईतील, दादर शिवाजी पार्क परिसराममध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे. रस्त्यालगत असलेल्या या पुतळ्यावर अज्ञाताकडून लाल रंग फेकून त्याच विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. ही बाब कानावर पडताच शिवसैनिक, तसेच स्थानिक खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, उपस्थित शिवसैनिकांनी पुतळ्याची स्वच्छता करून घेतली. मात्र आता शिवाजी पार्क परिसरात शिवसैनिक दाखल होण्यास सुरुवात झाली असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !