वाळूच्या ट्रकने घेतले एकाच कुटूंबातील सात जणांचे प्राण


Sand truck kills seven members of the same family नेल्लोर (17 सप्टेंर 2025) : वाळूने भरलेला ट्रक कारवर आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांना जागीच आपला जीव गमवावा लागला. सर्व मृत नेल्लोर शहरातील रहिवासी असून आत्मकुर सरकारी रुग्णालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना हा आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात बुधवारी हा अपघात घडला.

काय घडले नेमके ?
नेल्लोर जिल्ह्यातील संगम मंडलजवळ वाळूने भरलेला ट्रकने कारला जोरदार धडक दिली. यात एकाच कुटुंबातील 15 वर्षीय मुलीसह सात जणांचा मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की, वाहन लॉरीखाली चिरडले गेल्यामुळे मृतदेह ओळखणेही कठीण झाले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी अधिकार्‍यांना शोकग्रस्त कुटुंबांना पूर्ण पाठिंबा आणि मदत देण्याचे निर्देश दिले. चंद्राबाबूंनी अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीदेखील या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी त्यांनी अधिकार्‍यांना आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !