सोनगीरजवळ भरधाव आयशर ट्रकवर आदळला : क्लीनर ठार, चालक जखमी

Speeding Eicher hits truck near Songir : Cleaner killed, driver injured सोनगीर (19 सप्टेंबर 2025) : भरधाव आयशर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसर्या ट्रकवर धडकून झालेल्या अपघातात क्लीनर ठार झाला तर चालक गंभीर जखमी आहे. हा अपघात गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी पहाटे 2 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास सोनगीर बारीजवळ घडला.
असा घडला अपघात ?
इंदूरहून मुंबईकडे निघालेल्या आयशर ट्रकचा (क्र.एम.पी.09 डी.पी.1941), चालक यासीम खान आणि क्लीनर अजय जयराम बघेल (वय 26, रा. राजूर, जि. बडवानी, मध्य प्रदेश) हे गाडीतून प्रवास करत होते. सोनगीर बारीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसर्या ट्रकला (क्र. एम.पी.09, एच.एच.3498) त्यांच्या गाडीने मागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, क्लीनर अजय याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला तर, चालक यासीम खानच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातानंतर दोघांनाही तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी अजयला मृत घोषित केले तर यासीम खानवर उपचार सुरू आहेत. मृत अजयचा भाऊ विकास बघेल याने धुळे शहर पोलिसांत माहिती दिली आहे.
