पश्चिम रेल्वेतर्फे उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या

Western Railway to run special trains for the convenience of railway passengers during festive season भुसावळ (20 सप्टेंबर 2025) : आगामी सण-उत्सवाच्या काळात वाढत्या प्रवाशांच्या गर्दीमुळे पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस-रेवा, उधना-बरौनी, उधना-जयनगर आणि उधना-समस्तीपूर दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
बांद्रा टर्मिनस – रेवा अनारक्षित विशेष गाडी (22 सेवा)
09029 विशेष दिनांक 18 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत बांद्रा टर्मिनस येथून दर गुरुवारी 04.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रेवा येथे 07.45 वाजता पोहोचणार आहे
09030 विशेष गाडी 19 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबरदरम्यान रेवा येथून शुक्रवार रोजी 11 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी बांद्रा टर्मिनस येथे दोन वाजता पोहोचणार आहे. या गाडीला बोरिवली, बोईसर, वापी, वलसाड, भेटस्थान, चालथान, बरडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, मदन महल, कटनी, मैहर आणि सतना थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 20 जनरल, एक द्वितीय आसन व सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन, एक जनरेटर कार बोगी असेल.
उधना-बरौनी विशेष गाडी (12 सेवा)
09033 विशेष दिनांक 20 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान दर मंगळवार आणि शनिवारी उधना येथून 8.35 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी बरौनी येथे पाच वाजता पोहचेल.
09034 विशेष 22 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबरदरम्यान दर गुरुवार आणि सोमवारी बरौनी येथून 6.45 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी उधना येथे सात वाजता पोहोचल. नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपारिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर आणि शाहपूर पटोरी. या गाडीत 14 वातानुकूलित तृतीय, एक द्वितीय आसन व सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन, एकजनरेटर कार बोगी असेल.
उधना-जयनगर विशेष गाडी (06 सेवा)
09067 विशेष गाडी 21 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबरपर्यंत दर रविवारी उधना येथून 12.20 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 20.30 वाजता जयनगर येथे 8.30 वाजता पोहचेल.
09068 विशेष गाडी 22 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरदरम्यान दर सोमवारी जयनगर येथून 11.30 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी उधना येथे 12.30 वाजता पोहचेल. या गाडीला चलथान, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, दरभंगा आणि मधुबनी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय, 14 वातानुकूलित तृतीय, पाच शयनयान, एक द्वितीय आसन व सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन, एक जनरेटर कार बोगी असेल.
उधना-समस्तीपूर विशेष गाडी (06 सेवा)
09069 विशेष गाडी 21 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरदरम्यान दर शनिवारी उधना येथून 8.35 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी समस्तीपूर येथे दोन वाजता पोहोचेल.
09070 विशेष गाडी 23 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरदरम्यान दर मंगळवारी समस्तीपूर येथून पाच वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी उधना येथे दोन वाजता पोहचेल. या गाडीला चलथान, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर आणि मुझफ्फरपूर येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला सात वातानुकूलित तृतीय, सात वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, एक द्वितीय आसन व सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन, एक जनरेटर कार असेल.
