अमळनेर हादरले : तंबाखू न दिल्याने 38 वर्षीय तरुणाची हत्या


Amalner shaken : 38-year-old youth murdered for not giving him tobacco अमळनेर (22 सप्टेंबर 2025) : तंबाखू न दिल्याचा क्षुल्लक वाद अमळनेरच्या पैलाड भागातील 38 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला आहे. मुकेश भिका धनगर (38, स्वामी विवेकानंद कॉलनी पैलाड, अमळनेर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर पोलिसांनी याप्रकरणी निखील विष्णू उतकर (45, करंजा पंचवटी, नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

क्षुल्लक वाद बेतला जीवावर
मयताचा भाऊ दिनेश भिका धनगर यांनी पोलिसात दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुकेश भिका धनगर (38, रा.स्वामी विवेकानंद कॉलनी, पैलाड, अमळनेर) हा रविवार, 21 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता घराबाहेर गेला होता. हेडावे नाक्यावर वडाच्या झाडाखाली त्याचे कोणाशी तरी भांडण सुरू असल्याचे प्रवीण पारधी याने सांगितले. घटनास्थळी जाऊन पाहिले असता दोघांमध्ये तंबाखू दिली नाही यावरून वाद सुरू होता. दिनेश त्यांचे भांडण सोडवायला गेला असता आरोपीने त्यालाही दगड मारला. म्हणून तो घरी जाऊन त्याच्या भावांना बोलवायला गेला. परत पाहिल्यानंतर आरोपी निखील उतकर हा मुकेशच्या डोक्यात ओबडधोबड दगडाने डोक्यात व तोंडावर मारत होता.






मुकेशला सोडवून उपचारार्थ दवाखानयात हलवल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांना खुनाची घटना कळताच अमळनेर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम व त्यांच्या पथकाने आरोपीला लगेच अटक केली. तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !