पतीचे विवाहबाह्य संबंध असल्यास पत्नीला भरपाई मागण्याचा अधिकार : दिल्ली हायकोर्ट

Wife has right to seek compensation if husband has extramarital affair: Delhi High Court नवी दिल्ली (23 सप्टेंबर 2025) : पतीचे दुसर्या महिलेशी अनैतिक विवाहबाह्य संबंध असल्यास व त्यानंतरच्या वादातून लग्न तुटले असल्यास पत्नी त्या महिलेविरुद्ध दिवाणी न्यायालयात खटला दाखल करू शकते व भरपाई मागू शकते, असा महत्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.
तर मागता येते भरपाई…!
न्यायालयाने म्हटले आहे की, जरी सर्वोच्च न्यायालयाने जोसेफ शाईन प्रकरणात व्यभिचाराला गुन्हेगारी श्रेणीतून वगळले असले तरी, विवाहबाह्य संबंधांचे कायदेशीर परिणाम अजूनही आहेत. एखाद्या तृतीय पक्षामुळे वैवाहिक कलह निर्माण झाला तर भरपाई मागता येते. हा निर्णय न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौर यांनी दिला. न्यायालयाने म्हटले की, विवाह हे एक पवित्र बंधन आहे. या नात्यात हस्तक्षेप करणारा कोणताही तृतीय पक्ष मानसिक किंवा भावनिक नुकसानीसाठी जबाबदार धरला जाऊ शकतो. अशा स्थितीत भविष्याचा विचार करून तो त्यासाठी भरपाईबाबत दावा करू शकतो.
लग्नानंतर 9 वर्षांनी वाढले ‘अंतर’
लग्नाच्या नऊ वर्षांनंतर त्यांच्यातील अंतर वाढले. महिलेने सांगितले की तिचे लग्न 2012 मध्ये झाले होते. 2018 मध्ये त्यांना जुळी मुले झाली. तोपर्यंत सर्व काही सुरळीत होते. परंतु 2021 मध्ये एक महिला तिच्या पतीच्या व्यवसायात सामील झाली आणि दोघे जवळ आले. तिचा पती त्या महिलेसोबत कामासाठी प्रवास करू लागला. सार्वजनिक ठिकाणी ते एकत्र फिरू लागले. प्रकरण वाढत गेल्याने तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. पत्नीने प्रेमापासून दूर राहण्याच्या कारणावरून खटला दाखल केला. हा खटला पतीच्या प्रेयसीविरुद्ध आहे त्यामुळे तो कौटुंबिक नव्हे तर दिवाणी न्यायालयात चालेल.
प्रेयसीविरोधात खटला
न्यायालयाने स्पष्ट केले की, या प्रकरणात हा खटला पतीविरुद्ध नाही तर पतीच्या प्रेयसीविरुद्ध आहे. त्यामुळे, त्याची सुनावणी कौटुंबिक न्यायालयात नाही तर दिवाणी न्यायालयात होईल. विवाह मोडण्याचे कारण ती महिला होती की नाही हे खटल्यात निश्चित केले जाईल. सकृतदर्शनी हा खटला चालवण्यायोग्य मानला गेला आहे. कारण त्यासंदर्भात पीडित महिलेने सबळ पुरावे सादर केले. ज्याआधारे न्यायालयाकडून संबंधितांना समन्स जारी करण्यात आले.
