पोलिस बॉईज असोशियन जिल्हाध्यक्षपदी यावलचे भूषण नगरे


Bhushan Nagare appointed as District President of Police Boys Association यावल (25 सप्टेंबर 2025) : यावल शहरातील भूषण पंढरीनाथ नगरे यांची जळगाव जिल्हा पोलीस बॉईज असोसिएशन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

पोललिस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी ही नियुक्त केली. भूषण नगरे हे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील रहिवासी असून ते पोलिस परिवारातील सदस्य आहेत. त्यांचे पोलिस बांधवांशी सलोख्याचे स्नेहपूर्ण संबंध असून सतत संपर्कात असतात. 2020 पासून ते पोलिस बॉईज असोसिएशनमधे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष या पदावर आहेत.

या निवडीबद्दल पोलिस दलातून आणि त्यांच्या हितचिंतक मित्रमंडळीसह सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !