धुळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : 17 लाखांच्या एमडीसह राजस्थानसह मालेगावातील दोघे जाळ्यात

MD worth Rs 17 lakh seized in Dhule : Two arrested धुळे (26 सप्टेंबर 2025) : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे राजस्थानसह मालेगावातील संशयीताला तब्बल 17 लाखांच्या एमडीसह अटक केली आहे. धुळ्यात प्रथमच एमडी ड्रगवर कारवाई झाली असून पोलिसांकडून आता संशयीताची कसून चौकशी सुरू रण्यात आली आहे.
सैय्यद अतीक सैय्यद (मालेगाव) व मजहर दखान युसूफ खान (राजस्थान) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार व सहकार्यांनी अत्यंत गोपनीय माहितीद्वारे ही कारवाई केली.
धुळ्यात ड्रग्जवर कारवाई झाल्याने आता विक्रेत्यांसोबतच खरेदीदारही यंत्रणेच्या रडारवर आले आहेत.
