मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे दौर्‍यावर : खान्देशवासीयांना घोषणेविषयी उत्सुकता


Chief Minister Devendra Fadnavis on Dhule tour today : Khandesh residents curious about the announcement जळगाव (27 सप्टेंबर 2025) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शनिवार, 27 सप्टेंबर रोजी धुळे शहरात आगमन होत आहे. धुळ्याचे सुपुत्र आणि राज्याचे माजी मंत्री स्व.रोहिदास दाजी पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित अभिवादन आणि पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपस्थिती देणार आहेत. दरम्यान, ते जळगावात देखील येणार असल्याची माहिती आहे.

धुळ्यातील सोहळ्यास देणार उपस्थिती
स्व.रोहिदास दाजी पाटील यांचे धुळ्याच्या विकासातील योगदान मोठे होते. त्यांनी कायम दुष्काळी धुळे तालुक्यात सिंचन, शिक्षण आणि सहकाराच्या माध्यमातून समृद्धी आणण्याचा प्रयत्न केला. धुळे जिल्हा तसेच राज्यभरातील विविध विभागांचे मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.

यांनी संयुक्त खान्देशाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. राजकारण, सहकार आणि शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक, कला, साहित्य, संस्कृती क्षेत्रातही त्यांचे कार्य मोठे होते. माजी मंत्री स्व.रोहिदास दाजी पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित अभिवादन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

जळगावात देणार हजेरी ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातही येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र त्यांचा अधिकृत दौरा अद्याप प्राप्त झालेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य दौर्‍यामुळे पोलिस प्रशासनाने देखील नियोजन सुरू केले आहे. पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले असून मुख्यमंत्री कुठे भेट देतात की केवळ विमानतळावर येतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जळगावकरांना मोठ्या अपेक्षा
जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना मुख्यमंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या दौर्‍यात केळी विमा प्रश्न, केळी आणि कापूस पिकांचे दर, रखडलेली विकासकामे, नवीन उद्योगांची कमतरता, तसेच अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि संपूर्ण कर्जमाफी यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर ते काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आजच्या दौर्‍यात खान्देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.

असा आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा
शुक्रवारी दुपारी 12.45 वाजता पुणे विमानतळावरून प्रया केल्यानंतर 1.25 वाजता ते जळगाव विमानतळावर दाखल होतील. दुपारी 1.30 वाजता ते हेलिकॉप्टरने धुळ्याकडे रवाना होतील व कार्यक्रमांना हजेरी दिल्यानंतर 3.25 वाजता जळगावकडे आगमन व 3.55 वाजता जळगावहून विमानाने प्रयाण करतील.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !