उधना-ब्रह्मपुर दरम्यान ‘अमृत भारत एक्सप्रेस धावणार : आज भुसावळात स्वागत
भुसावळ जंक्शनवर शनिवारी दुपारी 4.30 वाजता होणार आगमन

‘Amrut Bharat Express’ to run between Udhna-Brahmapur: Welcome in Bhusawal today भुसावळ (27 सप्टेंबर 2025) : भारतीय रेल्वेने प्रवासी सुविधा, सुरक्षितता आणि आधुनिक प्रवास एक्सप्रेस ही नवी वेगवान गाडी उधना – ब्रह्मपुर दरम्यान सुरू केली आहे. या गाडीमुळे भुसावळ विभागासह जळगाव, मलकापूर, अकोला आणि बडनेरा परिसरातील प्रवाशांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.
सकाळी दहा वाजता झाले उद्घाटन
गाडी क्रमांक 09021 उधना-ब्रह्मपुर अमृत भारत एक्सप्रेस ही उद्घाटन विशेष गाडी शनिवार, 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10.50 वाजता उधना येथून सुटली व दुसर्या दिवशी रविवारी संध्याकाळी 5.35 वाजता ब्रह्मपुर येथे पोहोचणार आहे तर गाडी 09022 ब्रह्मपुर-उधना अमृत भारत एक्सप्रेस ही गाडी सुध्दा शनिवार, 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता ब्रह्मपुर येथून सुटली असून रविवारी रात्री 9 वाजता उधना येथे पोहोचणार आहे. या गाडीची नियमित सेवा राहणार आहे
5 ऑक्टोंबरपासून नियमित सेवा
गाडी 19021 उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस 5 ऑक्टोबरपासून दर रविवारी सकाळी 7.10 वाजता उधना येथून सुटेल व दुसर्या दिवशी दुपारी 1.55 वाजता ब्रह्मपुर येथे पोहोचेल तर गाडी 19022 ब्रह्मपुर स्टेशनवरून उधना-अमृत भारत एक्सप्रेस 6 ऑक्टोबरपासून दर सोमवारी रात्री 11.45 वाजता सुटून तिसर्या दिवशी सकाळी 8.45 वाजता उधना येथे पोहोचेल. ही गाडी बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर,अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खरियार रोड, कांटाबांजी, टिटलगढ, केसिंगा, मुनीगुडा, रायगडा, पार्वतीपूरम, बोब्बिली, विजयनगरम, श्रीकाकुलम रोड व पलासा या प्रमुख स्थानकांवर थांबेल. या गाडीला 11 सामान्य श्रेणी डबे, 8 स्लीपर श्रेणी डबे, 1 पॅन्ट्री कार, 2 दिव्यांगजन/सामान व गार्डयुक्त डबे असे एकूण 22 डबे असतील.
