बोदवडमध्ये महाजनादेश यात्रेला दाखवले काळे झेंडे
राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्याकडून सुरक्षा रक्षकांनी हिसकावले झेंडे
बोदवड : महाजनादेश यात्रेनिमित्त बोदवडमध्ये आलेल्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्याने काळे झेंडे दाखवल्याने सुरक्षा यंत्राची पुरती धावपळ उडाली. हा युवक मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत असतानाच त्यास बाजूला नेवून त्याच्या ताब्यातून काळे झेंडे हिसकावण्यात आले. बोदवड शहरात 30 दिवस झाल्यानंतरही शहरात नळांना पाणी आलेले नाही, पालिकेकडून शहरात विकासाची कामे होत नाही तसेच रोजगाराच्या संधी नाही, दिड लाखांवर कर्ज असलेल्यांना कर्जमाफीचा लाभ नसल्याने काळे झेंडे दाखवल्याचे राष्ट्रवादी युवा कार्यकर्ता सागर पाटील यांनी सांगितले.