भुसावळात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त प्रभातफेरी
वासुदेव जेष्ठ नागरिक संघाचा उपक्रम
भुसावळ (1 ऑक्टोंबर 2025) : 1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन असल्याने जेष्ठांच्या विविध हक्क आणि अधिकार याविषयी जनजागृती करण्याच्या निमित्ताने जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. शहरातील वासुदेव ज्येष्ठ नागरीक संघाने प्रभातफेरी काढून प्रभागातील नागरिकांमध्ये जनजागृती केली.
ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव जेष्ठ नागरिक संघाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त प्रभातफेरी काढण्यात आली. ही प्रभात फेरी प्रभागातील रींग रोड जवळील वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यालयापासून सुरू झाली. पुढे मुक्ताई नगर, गणेश कॉलनी, डॉ.मोरेंच्या घराजवळून पुढे गणेश कॉलनी गणेश मित्र मंडळ, विशाल जंगलेंच्या घराकडून मोहित नगर, नारायण नगर, भिरूड कॉलनी, गोदावरी नगर व योग केंद्राला समारोप करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठांचा सन्मान करा,त्यांच्या अनुभवाचा आदर करा, ज्ञानाचा भांडार,अनुभवाचा आधार, ज्येष्ठ नागरिक आहेत समाजाचा मान, आपली संस्कृती, ज्येष्ठांचा सन्मान, ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजच गौरव, वृद्ध नाही ते आहे अनुभवाची खाणी, करू त्यांचा सन्मान हीच आमची वाणी आदी विविध घोषणा देत सोबत टाळ, मृदुंगाच्या साथीने हरे राम हरे राम राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे या गजराने प्रभाग दणादूण गेला.
यांचा प्रभात फेरीत सहभाग
यावेळी वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सतीश जंगले, भानुदास पाटील, संजीव चौधरी, प्रमोद बोरोले, धनराज पाटील, प्रभाकर झांबरे, पांडुरंग पाटील, ज्ञानदेव पाटील, सुनील सूर्यवंशी, डॉ.अशोक डाके, सुरेश नेहेते, विश्वनाथ वाणी, अशोक नेहेते, प्रकाश पंडित पाटील, लिलाधर पाटील, नरेंद्र महाजन, डी.एस.चौधरी, लता चौधरी, भास्कर खाचणे, आर.एल.चौधरी गणेश सरोदे, हरी नाटू पाटील, लता जंगले, श्रीमती विजया पाटील, श्रीमती इंदुबाई सपकाळे, पुंजो भारंबे, रमण भोळे, सुरेश करंदीकर, मोतीराम चौधरी, यशवंत मोतीराम वारके, दत्तात्रय चौधरी, सोपान नेमाडे, शरद पाटील, मंगल दादा कोळी, विश्वनाथ वाणी, सतीश मराठे, ज्योती चौधरी, विजया पाटील आदी सदस्य प्रभातफेरीत सहभागी झाले.




