भुसावळातील नाहाटा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी
Medical examination of students of Nahata College, Bhusawal भुसावळ (1 ऑक्टोंबर 2025) : शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी मंगळवार, 30 व बुधवार, 1 ऑक्टोंबर रोजी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयात शिक्षण घेणार्या प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएससी व बीसीए तसेच एम.ए.एम. कॉम, एम.एस्सी, एमसीए या विभागात शिक्षण घेणार्या एकूण 847 विद्यार्थी व विद्यार्थीनींची तपासणी करण्यात आली.
यांनी केली तपासणी
यावेळी शहरातील प्रतिष्ठित डॉ.वीरेंद्र झांबरे, डॉ.चैताली झांबरे, डॉ.धैर्यसागर राणे, डॉ.राहुलसिंग, डॉ.अभय जावळे, डॉ.एस.एम.पाटील, डॉ.केतन महाजन, डॉ.विद्याधर भोळे यांनी तपासणी केली तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य दीपक पाटील, डॉ.जी.आर.वाणी, प्रा.सचिन येवले, सचिन कोलते, पी.एच.इंगोले, एम.एन.पाटील, गौतम भालेराव, स्वाती फालक, पूनम महाजन, दिनानाथ पाठक, भगवान तायडे आदी उपस्थित होते.





