भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात माहिती अधिकार दिन उत्साहात


Right to Information Day celebrated with enthusiasm at K. Narkhede Vidyalaya in Bhusawal भुसावळ (1 ऑक्टोंबर 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात नुकताच माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक वर्षी 28 सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा होतो. यंदा रविवार आल्याने शासकीय आदेशानुसारच हा दिन 29 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, उपमुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक एस.पी.पाठक उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे यांनी माहिती अधिकार दिनाची प्रस्तावना विषद केली.


पर्यवेक्षक एस.पी.पाठक यांनी माहिती अधिकार दिनाचे महत्त्व, आवश्यकता विद्यार्थ्यांसमोर विषद केली. उपमुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांनी सुद्धा या संदर्भात विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. या अनुषंगाने विद्यालयातील उपशिक्षिका रिता महाजन यांनी निबंध स्पर्धेचे आयोजन केले. निबंध स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व माहिती अधिकार दिनाच्या संदर्भात निबंधातून स्वतःचे विचार व्यक्त केले. यशस्वीतेसाठी रिता महाजन व माधव गरूडे यांनी विशेष परिश्रम घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !