शेतकरी भाजपत गेल्यानंतर कर्जमाफी देणार का? : उद्धव ठाकरेंचा सवाल

Will farmers be given loan waiver after joining BJP? : Uddhav Thackeray’s question मुंबई (1 ऑक्टोबर 2025) : भाजपने जाहिरातबाजीवर जेवढा पैसा खर्च केला, तेवढाच पैसा पूरग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी करीत फडणवीसांवर टीकेचे बाण चालवले.राज्यातील सर्व शेतकरी भाजपमध्ये गेल्यानंतर कर्जमाफी करणार का? असेही ते म्हणाले.
कर्जमाफी ही झालीच पाहिजे
ठाकरे म्हणाले की, पूरग्रस्तांना पक्की घरे बांधून द्यावी, शेतकर्यांची कर्जमाफी करावी, ज्यांची घरे उध्वस्त झाली त्यांना पक्की घर बांधून द्यायला हवी व शेतकर्यांना एकरी 50 हजार रुपये मदत झालीच पाहिजे, अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली. केंद्र सरकारचे पथक अजूनही राज्यात आले नसल्याचे म्हणाले.
ओला दुष्काळ अशी संज्ञा सरकारी कामकाजात नाही, असे जर तुम्ही म्हणत असाल तर तो शब्द काढून टाका मात्र शेतकर्यांना मदत करा, अशी मागणी त्यांनी केली. ओला दुष्काळ शब्द नसला तरी जे सत्य आहे, त्याला नाकारता येत नाही. असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सरकार शेतकर्यांना मदत करण्याच्या तयारीत दिसत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला. पीक विम्याचे पैसे कधीही शेतकर्यांना मिळू शकत नाहीत, असे निकष लावण्यात आला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. विमा कंपन्यांचे निकष पूर्ण होतच नाही, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
सातबारा कोरा, कर्ज माफ, हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत
राज्यातील अतिवृष्टीने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतातील उभे पीक वाहून गेले आहे. सोयाबीन, कापूस, तूर यांसारखी पिके पूर्णपणे हातातून गेली आहेत. अनेकांच्या संसाराचे सामान पाण्याबरोबर वाहून गेले. या पार्श्वभूमीवर शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याची, त्यांचे कर्ज माफ करण्याची आणि हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
