धुळे तालुका पोलिसांची मोठी कामगिरी : बचत गट अधिकार्‍याला लूटणारी टोळी 24 तासात गजाआड


Dhule Taluka Police’s big achievement : Gang that robbed self-help group official busted in 24 hours धुळे (1 ऑक्टोबर 2025) : बचत गटातील महिलांकडील कर्जाची रक्कम वसुली करून धुळ्याकडे निघालेल्या अधिकार्‍याला रस्त्यात एकांतात गाठून लुटण्यात आले आहे. आरोपींनी तब्बल एक लाख 17 हजारांची रोकड लूटत पोबारा केला होता. धुळे तालुका पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपींच्या मुसक्या आवळत गुन्ह्याची उकल केली आहे.

या आरोपींना बेड्या
पंकज अशोक सोनवणे (25), दीपक लक्ष्मण भील (19), माणिलाल सुकदेव भील (28), विनोद हिंमत भील (21), सचिन मोहन भील (20), योगेश उत्तम भील (27, सर्व रा.बाबरे, ता.जि.धुळे) असे अटकेतील आरोपींचे नावे आहेत.

काय घडले धुळे तालुका हद्दीत ?
तक्रारदार खुशाल मोतीराम पाटील (32, मुद्राणी प्र.उतरान ता.पारोळा) हे 26 सप्टेंबर रोजी दुचाकीने बाबरे, ता.धुळे येथून बचत गटाचे पैसे घेवून खोरदडतांडा येथे जात असतांनाच सहा जणांच्या टोळीने त्यांची दुचाकी अडवत बचत गटाचे साहित्य आणि एक लाख 17 हजारांची रोकड लुटत मारहाण करीत पळ काढला होता. धुळे तालुका पोलिस निरीक्षक धनंजय पाटील व शिरुड दुरक्षेत्राचे पािेलस उपनिरीक्षक कृष्णा पाटील व अधिनस्त अंमलदारांनी तक्रारदाराच्या वर्णनानुसार आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने सहा आरोपींच्या टोळीला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्यांना 3 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपींच्या घरात 80 हजार 700 रुपयांची रोकड तसेच 50 हजार रुपये किंमतीची बजाज पल्सर असा एकूण एक लाख 30 हजार 700 रुपयांचा मुद्देमाली जप्त करण्यात आला.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
धुळे तालुका पोलिस निरीक्षक धनंजय पाटील, फौजदार कृष्णा पाटील, हवालदार ललित खळगे, हवालदार प्रकाश सोनवणे, हवालदार मनोज शिरसाठ, कॉन्स्टेबल जयेश बाविस्कर, कॉन्स्टेबल दीपक मोहिते, कॉन्स्टेबल संदीप गुरव, कॉन्स्टेबल राहुल देवरे आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. तपास पोलिस उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत अराहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !