जामनेरातील स्फोटानंतर जाग : फत्तेपुरातील धाडीत सहा सिलिंडर जप्त


After the explosion in Jamner, six cylinders were seized in a raid in Fatehpur. जामनेर (1 ऑक्टोबर 2025) : जामनेरात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना झालेल्या दुर्घटनेचा धडा घेत फत्तेपूर येथे मंगळवारी प्रवासी वाहनात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना पोलिस यंत्रणेने कारवाई केल्याने खळबळ उडाली.या कारवाईत तब्बल साडेतीन लाखांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाईने उडाली खळबळ
मंगळवारी फत्तेपूर येथील सप्तशृंगी नगरात फत्तेपूर पोलिसांनी धाड टाकली. संजय संपत श्रावणे हा आपल्या राहत्या घरासमोर लोणी येथील दीपक रतन वावरे याच्या इको चारचाकी वाहनात एलपीजी गॅस सिलिंडरमधून अवैधरीत्या गॅस भरत असताना आढळल्याने पोलिसांनी इको कार (एम.एच 19 डी. व्ही. 6557), सहा सिलेंडर, गॅस भरण्यासाठी वापरले जाणारी मशीन मिळून तीन लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पुरवठा निरीक्षक नारायण सुर्वे यांनी पंचनामा केला.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !