मेहरुण तलावात मासेमारी करताना प्रौढाचा मृत्यू

Adult dies while fishing in Mehrun Lake जळगाव (2 ऑक्टोबर 2025) जळगाव शहरातील मेहरूण तलावात मासेमारी करताना प्रौढाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजता घडली. एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. काझी अब्दुल वाहिद रईस अहमद (45, रा.फातिमा मस्जिद जवळ, मेहरूण, जळगाव) असे मृताचे नाव आहे.
तोल गेल्याने मृत्यू
काझी अब्दुल वाहिद रईस अहमद हे मशिदीत काम करून परिवार चालवत होते. मंगळवार, 30 सप्टेंबर रोजी दुपारी ते मेहरूण तलाव येथे मासेमारी करण्यास गेल्यानंतर त्यांचा अचानक तोल गेला व बुडून त्यांचा मृत्यू झाला. शोध सुरू असताना बुधवारी संध्याकाळी त्यांचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे.
दरम्यान, नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृतदेह हलवल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
