समुद्राच्या लाटेत आठ जण बेपत्ता : तिघांचे मृतदेह सापडले

Eight people missing in sea waves : Bodies of three found सावंतवाडी (3 ऑक्टोबर 2025) : बेळगावसह कुडाळ येथील परिवार समुद्रात अंघोळीसाठी गेल्यानंतर अचानक आलेल्या समुद्राच्या लाटेत तब्बल आठ जण बेपत्ता झाले. त्यापैकी तिघांचे मृतदेहच आढळले. ही घअना शिरोडा वेळागर येथील समुद्रात घडली. एका मुलीला वाचविण्यात यश आले असून अन्य चार जणांचा शोध सुरू आहे.. समुद्रात उतरणार्यांमध्ये सहा जण बेळगावचे तर दोघे कुडाळचे रहिवासी आहेत.
काय घडले समुद्रात ?
शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वेळागर सुरूची बागे समोर दोन परिवारातील सदस्य अंघोळीसाठी उतरले मात्र त्याचवेळी समुद्राच्या लाटेत ते बेपत्ता झाले. तिघांचे मृतदेह हाती आले तर स्थानिक मच्छीमार लाईफ गार्डच्या मदतीने चार जणांचा शोध घेण्यात येत असून एका मुलीला वाचवण्यात यश आले आहे. समुद्राची आलेली लाट आणि किनार्यावर असलेला खोल खड्डा यामुळे ही घटना घडली.
तिघांचा मृतदेहच हाती
मृतांमध्ये फरीन इरफान कित्तूर (34 )इबाद इरफान कित्तूर (13) नमीरा आफताब अखतार (16 सर्व रा.लोढा बेळगाव) यांचा समावेश आहे तर इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (36)इकवान इमरान कित्तूर (15 दोन्ही रा.लोंढा बेळगाव), फराहान महम्मद मणियार (25), जाकीर निसार मणियार वय (13, कुडाळ सिंधुदुर्ग) हे बेपत्ता झाले आहेत तर इसरा इम्रान कित्तूर (17, रा.लोढा, बेळगाव) ला वाचवण्यात यश आले आहे.
