तरुणाचा खून करून अपघाताचा बनाव : नातेवाईकांचा जामनेरात रास्ता रोको


Murder of a young man and fabrication of an accident : Relatives block the road in Jamnerat जामनेर (4 ऑक्टोबर 2025) : शेतात आढळलेल्या तरुणाचा मृत्यू हा अपघात नसून खून असल्याने दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी जामनेरात रास्ता रोको केला. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.

काय घडले तरुणासोबत ?
हिवरखेड्यातील प्रदीप कडू चांदणे (37) या तरुणाचा मृतदेह शेतात आढळला होता मात्र हा आरोपींनी अपघाताचा बनाव केला असून तो खून असल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी जामनेरात रास्ता रोको केला.

जामनेर येथे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमास हिवरखेडा येथील प्रदीप चांदणे यास सायंकाळी 6.30 वाजता दोघेजण घरून घेऊन गेले होते. प्रदीप घरी आला का त्याचा मोबाईल आमच्याकडे आहे. असे विचारण्यासाठी रात्री उशिरा दोघेजण चांदण्याच्या घरी आले. नातेवाइकांनी शोधाशोध केली असता चांदणे याचा मृतदेह शेतात आढळला. पीआय मधुकर कासार, पं.स.चे माजी सदस्य अमर पाटील यांनी नातेवाईकांच्या मदतीने पहाटे तीन वाजता त्याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला.

जामनेरकडून हिवरखेड्याकडे जाणार्‍या नदीकाठच्या रस्त्याकडेला प्रदीप यांच्या अंगावर दुचाकी पडलेली असल्याचे रात्री उशिरा निदर्शनास आले. मात्र त्याच्या चेहर्‍याला जबर मार लागल्याने अपघात झाला असावा अशा कुठल्याही खुणा नव्हत्या. चेहर्‍याची अवस्था पाहता प्रदीप याचा खून झाला असल्याचे आरोप नातेवाईकांनी यावेळी केला.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !