प्रवाशांची गैरसोय टळली : साईनगर शिर्डी-कालका एक्स्प्रेसला एक अतिरिक्त एसी डबा


Sainagar Shirdi-Kalka Express to get an additional AC coach भुसावळ (4 ऑक्टोबर 2025) : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याच्या दृष्टीने साईनगर शिर्डी ते कालका एक्सप्रेसला (गाडी क्रमांक 22455 व 22456) एक अतिरिक्त वातानुकूलित-तृतीय श्रेणीचा (थर्ड एसी) डब्बा कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

प्रवाशांना मोठा दिलासा
साईनगर शिर्डी-कालका एक्सप्रेसला शिर्डीपासून 4 ऑक्टोबरपासून तर कालकापासून 2 ऑक्टोबरपासून हा डबा जोडला जोडण्यात आला आहे. यामुळे गाडीच्या सुधारित संरचनेत आता बदल झाला आहे. आता एक वातानुकूलित-द्वितीय, तीन वातानुकूलित-तृतीय, पाच शयनयान, पाच जनरल सेकंड क्लाससह दोन लगेज कम गार्डचे ब्रेक व्हॅन असे एकूण गाडीच्या संरचनेत आता 16 डब्बे असतील, ज्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायक आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !