भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात युवतीसाठी योग प्रशिक्षण कार्यशाळा
भुसावळ (4 ऑक्टोबर 2025) : दि पीपल्स चॅरिटेबल संस्था संचलित दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात युवती सभा अंतर्गत आत्मनिर्भर युवती अभियान या सहा दिवसीय कार्यक्रमांमध्ये चतुर्थ सत्रात युवतींसाठी योग प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
प्रमुख वक्त्या अद्वैतानंद योगा व फिटनेसच्या संचालिका प्रा.डॉ.सीमा देवेंद्र पाटील होत्या. यावेळी व्यासपीठावर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ संजय चौधरी व युवती सभा सचिव प्रा.संगीता धर्माधिकारी उपस्थित होत्या.

डॉ सीमा पाटील यांनी युवतींना योगासन व प्राणायाम याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी युवतींना त्यांच्या आरोग्यासाठी योगासनांचे महत्व पटवून दिले स्थुल योगासन, सुक्ष्म योगासन, प्राणायाम व ध्यानधारणेची माहिती दिली. युवतींनी चिरतरूण राहण्यासाठी व त्वचा नितळ ठेवण्यासाठी फेसयोगा व चेहर्याच्या अॅक्युप्रेशर पॉईंटची माहिती दिली युवतींना समतोल डाएटचे मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण शिबिरात प्रथम वार्मअप व नंतर ताडासन त्रिकोणासन भद्रासन पादहस्तासन पश्चिमोतासन भुजंगासन व नाडीशुद्धीकरण इ. चे प्रशिक्षण दिले
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी योग ही उत्कृष्ट जगण्याची कला आणि विज्ञान आहे. योगाने शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते. युवती योग दैनंदिन जीवनात आत्मसात करून निरामय जीवन जगू शकतात व अभ्यासात मन एकाग्र करू शकतील.
प्रास्ताविक संगीता धर्माधिकारी तर सूत्रसंचालन डॉ.माधुरी पाटील व तसेच आभार प्रा.श्रेया चौधरी यांनी मानले. कार्यक्रमास डॉ.ए.के.पाटील व डॉ.जे.पी.सरोदे उपस्थित होते.




