गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे शिरसोली येथे दंत तपासणी शिबीर


जळगाव (4 ऑक्टोबर 2025) : गांधी रिसर्च फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ राँयल, इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिरसोलीत दंत तसासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात एकूण 200 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. रोटरी क्लब राँयलचे अध्यक्ष जितेंद्र भोजवानी, जितूलाल रोटे, डॉ.जयदीपसींग छाबडा, डॉ. बिंदू छाबडा, डॉ.वर्षा रंगलानी, डॉ.स्नेहल महाजन यांनी सेवा दिली.

बारी समाज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यासाठी मोफत मौखिक दंत तपासणी शिबीर आयोजित केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना वैक्तिगत स्वच्छतेबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आरोग्यावर आधारीत नाटीका सादर करण्यात आली. डॉ.ज्योत्सना पाटील यांनी ‘व्यसनांचे दुष्परिणाम’ या विषयी माहिती दिली. रोटरी क्लबकडून मुलांना ब्रश व बिस्कीट वाटप करण्यात आले.

शिबिरात डॉक्टरांनी दातांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?, ब्रश कसा करावा?,दातांच्या आरोग्यासाठी पोषक आहार कोणता घ्यावा?, त्याचबरोबर तंबाखू, गुटखा, सुपारी या व्यसनापासून दूर राहावे, याबाबत मार्गदर्शन केले. उपचारांची गरज असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत संदेश पोचविण्यासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे स्वयंसेवक विक्रम अस्वार, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण काटोले व श्रावण ताडे, मुदतसर पिंजारी मदत करणार आहेत. प्रास्ताविक प्रशांत सुर्यवंशी यांनी केले. शिबिराच्या व्यवस्थापणासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !