दुचाकींचा भीषण अपघात : शेंदुर्णीतील दोघे तरुण जागीच ठार

जामनेर तालुक्यातील सोयगाव ते शेंदुर्णीदरम्यान दुचाकींचा अपघात


Fatal two-wheeler accident: Two youths from Shendurni died on the spot शेंदुर्णी (5 ऑक्टोबर 2025) : दोन दुचाकींच्या भीषण अपघातात शेंदुर्णीतील दोघे तरुण जागीच ठार झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. अपघाताच्या घटनेनंतर शेंदुर्णी गावात शोककळा पसरली आहे. नचिकेत मनोज जोशी (18, रा.शेंदुर्णी, ता.जामनेर) व विशाल अशोक गुजर (27, रा.शेंदुर्णी, ता.जामनेर) अशी मृतांची नावे आहेत.

काय घडले तरुणांसोबत ?
खाजगी वाहन चालक असलेला विशाल आईसह शेंदुर्णीत वास्तव्याला होता तर मृत आरएसएस स्वयंसेवक असलेल्या नचिकेतचे वडील संगणक दुकान चालवतात. मित्रांसोबत विशाल शुक्रवारी सोयगावकडे गेल्यानंतर परतीच्या प्रवासात शनिवार, 4 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास समोरून येणार्‍या नचिकेतच्या दुचाकीची जबर धडक बसली.

या धडकेत विशाल व नचिकेतला यांच्या डोक्याला जबर ईजा बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. रुग्णालयात कुटुंबीय व मित्र परिवाराने मृतदेह पाहताच आक्रोश केला. अपघातानंतर शेंदुर्णी गावात शोककळा पसरली आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !