कुसूंबा हादरले : कुरीयर चालक कर्मचार्‍याच्या घरावर गोळीबार व दगडफेक ; पाच अटकेत


Kusumba shaken : Firing and stone pelting at courier driver’s house ; five arrested जळगाव (5 ऑक्टोबर 2025) : दुचाकीवरून सिनेस्टाईल आलेल्या 8 ते 10 अज्ञात हल्लेखोरांनी तब्बल तीन गोळ्या झाडत व दगडफेक केल्याची धक्कादायक घटना कुसूंब्यात घडली. या घटनेने कुसूंब्यात प्रचंड खळबळ उडाली असून गावात दहशतीचे वातावरण आहे. हल्ल्यामागे जुना वाद समोर आला असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर स्थानिक पाच आरोपींना अटक करण्यात आली.

काय घडले कुसूंब्यात ?
चंद्रशेखर पाटील हे कुरीयर चालक असून ते कुटूंबासह राहतात व संशयीतांशी त्यांचा जुना वाद आहे. शनिवारी रात्री ते 10.30 वाजता ते पत्नीसोबत घरात जेवत असताना काही दुचाकी त्यांच्या घरासमोर थांबल्या. त्यावरून उतरलेल्या 8 ते 10 हल्लेखोरांनी प्रथम शिवीगाळ केली व घराच्या दिशेने जोरदार दगडफेक केल्याने खिडक्यांच्या काचा फुटल्या व घराबाहेर लावलेली पाटील यांची दुचाकीही फोडली.

हल्लेखोरांपैकी काहींनी आपल्याजवळील शस्त्राने घराच्या दिशेने तीन गोळ्या झाडलया. अचानक झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने पाटील कुटुंब आणि शेजारी प्रचंड घाबरले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड आणि एमआयडीसी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

पोलिसांनी घटनास्थळावरून गोळीबाराच्या दोन रिकाम्या पुंगळ्या घराबाहेरून आणि एक घरातून जप्त केली आहे. फॉरेन्सिक पथकानेही पुरावे गोळा केले आहेत. पाच संशयीतांना ताब्यात घेण्यात आल्याचे खास सूत्रांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !