जळगावात रेल्वेखाली आल्याने तरुण ठार


Youth dies after being run over by train in Jalgaon जळगाव (6 ऑक्टोबर 2025) : अनोळखी तरुण रेल्वेखाली आल्याने जागीच ठार झाला. पटवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील यार्ड परिसरात शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

काय घडले तरुणासोबत ?
जळगाव रेल्वे स्थानक येथील यार्ड जवळ सेवाग्राम एक्सप्रेसखाली आल्याने एका अनोळखी अंदाजे 30 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार, 4 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास रेल्वे खंबा क्रमांक 419 जवळ घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तरुणाच्या डोक्याला व कमरेला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मयत तरूणाची अद्याप ओळख पटलेली नाही. मयताची ओळख पटवावी असे आवाहन रेल्वे पोलीसांनी केली आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार एच.सी.चौधरी करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !