एमपीडीएचा गैरवापर ; जळगाव जिल्हाधिकार्यांना दोन लाखांचा दंड ; काय आहे नेमके प्रकरण ?

Misuse of MPDA; Jalgaon District Collector fined Rs 2 lakh ; What is the exact matter? जळगाव (6 ऑक्टोबर 2025) : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने ‘एमपीडीए’ कायद्याचा बेकायदेशीर वापर केल्याने दोन लाखांचा दंड ठोठावल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
दीक्षांत सपकाळे जुलै 2024 मध्ये न्यायालयीन कोठडीत असताना, जळगाव जिल्हाधिकार्यांनी 18 जुलै रोजी ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत त्याला ताब्यात घेण्याचे आदेश जारी केले होते मात्र हे आदेश तब्बल 10 महिने म्हणजेच 23 मे 2025 पर्यंत सपकाळेला सादरच करण्यात आले नाहीत. विशेष म्हणजे, ज्या दिवशी हे आदेश सादर केले, त्या दिवशी त्याला जामीन मिळाला होता.
सुनावणीदरम्यान, जिल्हाधिकार्यांनी उल्लेख केलेल्या गुन्ह्यात ‘टंकलेखनातील चूक’ असल्याचे शासनाने सांगितले, हे ऐकून खंडपीठाला धक्काच बसला. यासोबतच, मराठी शिकलेल्या सपकाळेला ताब्यात घेण्याचे आदेश इंग्रजीत दिले होते, याचीही न्यायालयाने गंभीर दखल घेतली. आदेशाचे मराठीत भाषांतर करून देणे आवश्यक होते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दंडाची रक्कम आदेश जारी करणार्या जिल्हाधिकारी यांच्या पगारातून वसूल करावी तसेच संबंधित व्यक्तीच्या जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करत दीक्षांत सपकाळे यांना तत्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत.
