भुसावळात रेल्वे कर्मचार्‍यावर चाकू हल्ला : चौकडीविरोधात गुन्हा


Knife attack on railway employee in Bhusawal: Case filed against quartet भुसावळ (6 ऑक्टोबर 2025) : दारू पिणार्‍या व्यक्तींना हटकल्याचा राग आल्याने रेल्वे कर्मचार्‍याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत चाकूने हल्ला केल्याची घटना शहरातील 15 बंगला परिसरात घडली. याप्रकरणी चौघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले भुसावळ शहरात ?
चेतन प्रतापसिंग खरारे (40, रा.सरस्वतीनगर, भुसावळ) गेली 17 वर्षे रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये खलाशी पदावर कार्यरत असून रात्रीच्या वेळी परिसराची देखरेख करतात. गुरुवार, 2 रोजी रात्री 11 वाजता गस्त घालत असताना त्यांनी काही व्यक्तींना दारू पिताना पाहिल्यानंतर हटकल्याने चिडून बबलू ठाकुर, अजय सहारे, सुजित सहारे व मनोज सहारे (सर्व रा. शिवाजीनगर) यांनी खरारे यांच्यावर हल्ला चढवला.

चौकडीविरोधात गुन्हा
अजय सहारे याने लाकडी दांडक्याने त्यांच्या पाठीवर मारहाण केली. सुजित सहारे याने चाकू काढून डाव्या त्यांच्या डोळ्याजवळ वार केला व शिविगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. खरारे गंभीर जखमी झाल्याने खाजगी रुग्णालयात प्राथिमक उपचार करून जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी शनिवार, 4 रोजी रात्री तक्रार दाखल दिल्यावरून चौकडीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार अर्चना अहिरे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !