पारोळ्याजवळ कारच्या धडकेने दुचाकीस्वार ठार


Biker killed in car collision near Parola पारोळा (6 ऑक्टोबर 2025) : पारोळा तालुक्यातील दळवेलजवळ महामार्ग 53 वरील हॉटेल स्वर्गसमोर भरधाव मर्सिडीजने दुचाकीला उडवल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडला. गोरख सुरसिंग भील (47, भोलाणे) असे अपघातात ठार झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

असा घडला अपघात ?
गोरख भील हे शुक्रवार, 3 रोजी दुचाकी (एम.एच.19 ए.झेड. 7539) ने पारोळा येथे श्री बालाजी महाराजांचा रथ पाहण्यासाठी आल्यानंतर घराकडे परतत असताना महामार्ग 53 वर दळवेल जवळील हॉटेल स्वर्गसमोर रात्री 8 वाजेच्या सुमारास मर्सिडीज कार (एम.एच.12. एक्स.एन.8090) ने त्यांच्या दुचाकीला मागाहून जबर धडक दिली. या अपघातात गोरख भील यांचा डोक्यास, पायाला व छातीस गंभीर इजा झाली व त्यांच्या नाका, तोंडातून रक्तस्त्राव झाला.

तत्काळ रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्याच्या वाडी माळुगे येथील ओम तेजराज मनस्कर हे कार चालक गाडी चालवत होते. याबाबत प्रभू गोरख भील यांच्या माहितीवरुन पारोळा पोलिसांत मर्सिडीज कार चालक ओम तेजराज मनस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !