दोन उपमुख्यमंत्र्यांचा पेच मात्र विठुरायाच्या महापूजेचा मान एकनाथ शिंदेंनाच !

पंढरपूर (7 ऑक्टोबर 2025) : राज्याच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते येणार्या कार्तिकी शुद्ध एकादशीची शासकीय महापूजा करावी? हा प्रश्न समोर आल्याने पेच निर्माण झाला होता मात्र यंदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते रविवार, 2 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कार्तिकी एकादशीला महापूजेसंदर्भात मंदिर समितीने शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदेंना मंदिर समितीच्या वतीने पूजेचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. दरम्यान, कार्तिकी एकादशीला महापूजा कोण करणार याबाबत मंदीर समितीकडून विचारणा करण्यात आली होती. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील लवकरच बोलतील, असेही सांगण्यात येत आहे.
