शिवसेना, धनुष्यबाण कोणाकडे राहणार? उद्या चित्र स्पष्ट होणार !

Shiv Sena, who will have the bow and arrow? The picture will be clear tomorrow! मुंबई (7 ऑक्टोबर 2025) : सर्वोच्च न्यायालयात उद्या महत्वपूर्ण निकाल लागणार असून त्यात शिवसेना व धनुष्यबाण कुणाकडे ? राहणार हे स्पष्ट होणार आहे. न्या.सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर अंतिम युक्तिवाद होणार असून त्यानंतर न्यायालय आपला निकाल राखून ठेवेल किंवा तत्काळ जाहीर करेल हे पहावे लागणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये शिवसेनेच्या नाव आणि पारंपरिक ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू असलेला वाद गेली तीन वर्षे सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. शिवसेनेत 2022 मध्ये मोठी बंडखोरी झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले होते.
निवडणूक आयोगाच्या या आदेशांना उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले होते. या प्रकरणात अनेक प्राथमिक सुनावण्या झाल्या असून, उद्या होणारी सुनावणी ही अंतिम टप्प्यातील निर्णायक कार्यवाही मानली जात आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंकडून सविस्तर युक्तिवाद पूर्ण झाले असून, उद्या निकाल लागण्याची शक्यता आहे.
लवकर निकाल देण्याबाबत याचिका
उद्धव ठाकरे गटाने जुलै महिन्यातच न्यायालयात याचिका दाखल करून शिवसेना नाव आणि चिन्हाच्या वादावर लवकर निर्णय द्या, अशी मागणी केली होती. त्यावर त्यावर 14 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. ही सुनावणी करताना न्या. सूर्यकांत, न्या. बागची यांच्या खंडपीठाने मुख्य याचिकेवर सुनावणी करणे योग्य राहील असं सांगत ऑगस्टमध्ये यावर सुनावणी घेऊ असे स्पष्ट केले होते मात्र राष्ट्रपती-राज्यपाल वादातील खटल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर पडली. आता उद्या आता न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठासमोर हा खटला अंतिम निर्णयासाठी येत आहे.
स्थानिक निवडणुकांपूर्वी मोठा राजकीय प्रभाव
जर धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडेच कायम राहिले तर त्यांना आगामी निवडणुकीत मोठा फायदा होईल वा न्यायालयाने जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय दिला तर राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात होऊ शकते.
