विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची 12 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या


Two students commit suicide by jumping from 12th floor in Virar विरार (7 ऑक्टोबर 2025) : दोन विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या 12 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजता घडली. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

श्याम सनद घोरई (20) आणि आदित्य रामसिंग (21) अशी मृतांची नोव आहेत. ते दोघेही नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले.

विरार पश्चिमेला आगाशी अर्नाळा रस्त्यावरील ओलांडा परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या 12 व्या मजल्यावरुन सोमवारी रात्री या विद्यार्थ्यांनी उडी टाकली. या घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. दोघांनी उडी टाकून सामूहिक आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ही आत्महत्या असल्यास आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. हे दोन तरुण नालासोपारा येथून आगाशी परिसरात नेमके कोणत्या कारणासाठी आले होते याबाबत अजून कोणतीही माहिती मिळलेली नाही.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !