जळगावातील शनीपेठ पोलिसांची कामगिरी : 14 लाखांचे सोने लांबवणार्‍या बंगालच्या कारागीराला बेड्या


Performance of Shanipeth Police in Jalgaon : Bengali craftsman arrested for smuggling gold worth Rs 14 lakhs जळगाव (7 ऑक्टोबर 2025) : जळगावातील सराफाकडील 14 लाखांचे सोने चोरत पश्चिम बंगालच्या कारागीराने धूम ठोकली होती. गुन्हा दाखल होताच आरोपीला शनीपेठ पोलिसांनी हैद्राबाद येथून बेड्या ठोकल्या. आरोपीच्या ताब्यातून तब्बल 14 लाखांचे सोने जप्त करण्यात आले. बिस्वजीत बनेस्वर सासमल (रिधुरवाडा, मूळ रा. वार्ड नं. 10 जयनगर पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

काय घडले जळगावात ?
जळगावात बालाजी पेठमध्ये निखील कैलास गौड (30) यांचे लक्ष्मीनारायण ज्वेलर्स नामक दुकान असून तेथे बिस्वजीत बनेस्वर सासमल (रा. वार्ड नं. 10, जयनगर, पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) हा कामास आहे. आरोपीने 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 3.30 ते 4.12 वाजेच्या दरम्यान दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला तसेच लाकडी ड्रॉवरचे कुलूप तोडून त्यातून 124 ग्रॅम सोने लांबवले.

हैद्राबादमधून आवळल्या मुसक्या
आरोपी सोने घेवून पत्नीकडे हैद्राबाद येथे गेल्याची माहिती कळताच 4 ऑक्टोबर रोजी संशयित आरोपी बिस्वजीत बनेस्वर सासमल यास अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान, आरोपीकडून 13 लाख 99 हजार रुपयांचे सोने आणि कटावणी (लांब कात्री), पकड आदी चोरी करण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, एपीआय साजीद मंसुरी, पीएसआय योगेश ढिकले, हवालदार अल्ताफ पठाण, हवालदार प्रदीप नन्नवरे, हवालदार योगेश जाधव, कॉन्स्टेबल योगेश साबळे, कॉन्स्टेबल निलेश घुगे, कॉन्स्टेबल अमोल वंजारी, कॉन्स्टेबल नवजीत चौधरी तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील कॉन्स्टेबल गौरव पाटील यांनी केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !