भुसावळातील के.नारखेडे माध्यमिक विद्यालयात आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response to health check-up camp at K. Narkhede Secondary School in Bhusawal भुसावळ (7 ऑक्टोबर 2025) : शहरातील के.नारखेडे माध्यमिक व उच्च विद्यालयात शहरातील गोल्डन अवर हॉस्पीटलच्या विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे सोमवार, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी दोन दरम्यान आयेाजन करण्यात आले. या शिबिराला स्कूलमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शंभरावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचारही करण्यात आले.
यांची शिबिराला उपस्थिती
शिबिराच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी.व्ही.पाटील होते. व्यासपीठावर प्रभारी मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक एस.एल.राणे, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, लिपिक प्रमोद तळेले, पर्यवेक्षक सुनील पाठक आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक राहुल भारंबे तर आभार गोल्डन अवरचे पीआरओ गणेश वाघ यांनी मानले.
यांनी केली तपासणी
शिबिरात गोल्डन अवरचे आरएमओ डॉ.आफताब खान, नर्सिंग ऑफिसर शिवानी सावळे व खुशी कासडे आदींनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांची आरोग्य तपासणी केली.
गरजूंवर रुग्णालयात वेळीच उपचार
उपस्थित मान्यवरांनी गोल्डन अवरने विद्यालयातील शिक्षकांसाठी राबवलेल्या मोफत आरोग्य शिबिर उपक्रमाचे कौतुक केले. शहरात 24 तास आरोग्य सुविधा देणार्या गोल्डन अवर रुग्णालयात विविध योजनेतून उपचार केले जात असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगत शिबिर आयोजनाबद्दल रुग्णालय प्रशासनाला धन्यवाद दिले.
