भुसावळात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात

Maharishi Valmiki Jayanti celebrated with enthusiasm in Bhusawal भुसावळ (7 ऑक्टोबर 2025) : शहरातील कोळी समाज विकास मंडळाच्या सभागृहात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कैलास सोनवणे यांच्याहस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
महर्षी वाल्मिकींनी श्रीरामाच्या जन्माआधी रामायणाची रचना आपल्या दिव्य दृष्टीतून केली. रामायणासारखा दिव्य ग्रंथ त्यांनी विश्वाला अर्पण केला. या ग्रंथाद्वारे नव समाजाची निर्मिती बंधू प्रेम, एक पत्नी व्रत, पितृ आज्ञेचे पालन, सदाचाराची शिकवण त्यांनी सर्व मानव जातीला दिली. अशा थोर महात्म्याच्या जीवनाद्वारे मानव जातीला दिव्य प्रेरणा मिळते, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे यांनी सुद्धा आपले मनोगतात सांगितले की, आद्यकवी महर्षी वाल्मिकी हे कोळी बांधवांचेच आद्य दैवत असले तरी त्यांनी रामायणाची रचना ही फक्त कोळी बांधवांसाठी केली नसून त्यांनी या महान ग्रंथाद्वारे संपूर्ण जगाला शिकवण दिली आहे.
यावेळी वसंत सपकाळे, शांताराम कोळी, दीपक सोनवणे, विजय तावडे, भागवत सपकाळे, रवींद्र बाविस्कर, धर्मा कोळी, गोकुळ सपकाळे, दत्तात्रय सपकाळे, महारु कोळी, संदीप कोळी, प्रदीप सपकाळे, आदी समाज बांधवांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन चंद्रकांत सूर्यवंशी तर आभार दीपक सोनवणे यांनी मानले.
