जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त डॉ.उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात प्रश्नमंजूषा स्पर्धा


जळगाव (7 ऑक्टोबर 2025) : वर्ल्ड फिजिओथेरपी वीक निमित्ताने डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या सभागृहात डॉ.उल्हास पाटील फिजिओथेरेपी महाविद्यालयातर्फे क्विझ स्पर्धा आयोजित करण्यात आली.

स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर आणि राहुल गिरी (प्रशासकीय विभाग) यांच्याहस्ते झाले. या स्पर्धेत पदवी, इंटर्न्स आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचा थरारक सामना झाला. तीव्र चुरशीच्या स्पर्धेनंतर पोश्चर पायरट्स या संघाने विजेतेपद पटकावले. विजयी संघामध्ये खालील सदस्यांचा समावेश होता.

डॉ.उमैर मुर्की, डॉ.खुशी नवल, श्रृती भट, अनम विच्छी, सोहम राय,नंदिनी जाधव विजेत्या विद्यार्थ्यांचे केवळ शैक्षणिक गुणवत्तेसाठीच नव्हे तर उत्कृष्ट टीमवर्क आणि आत्मविश्वासासाठीही कौतुक करण्यात आले.यशस्वीतेसाठी डॉ.शुभ शंकर साहू, डॉ.तेजल, डॉ.रुतुजा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !