भुसावळ शहरात उर्दू मुशायरा : शेर व गझलांनी मिळाली उत्स्फूर्त दाद

Urdu Mushaira in Bhusawal city: Sher and ghazals received spontaneous applause भुसावळ (8 ऑक्टोबर 2024) : अनिक फाऊंडेशन व उत्कर्ष आविष्कार फाउंडेशन भुसावळ यांच्या वतीने शहरात उर्दू मुशायर्याचे आयोजन नुकतेच दिनार फर्निचर हॉल या ठिकाणी आयोजन करण्यात आले.
यावेळी अंबाजोगाई येथील साधना सेवाभावी संस्थेचे सचिव दगडू दादा लोमटे यांना साहब ए एजाझ (सिम्बॉल ऑफ हुम्यानिटी) हा बहुमान डायमंड माध्यमिक व सावदा उच्च माध्यमिक महाविद्यालयाचाचे अध्यक्ष डॉ.हाजी हरून व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते देण्यात आला. मानपत्र, स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ असे सन्मानाचे स्वरूप होते. त्यानंतर उर्दू मुशायर्याचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रतिभावान शायरानी आपल्या उत्कृष्ट गझला, शेर सादर करून आलेल्या मोठ्या समुदायात चैतन्य निर्माण केले.
शकील हसरत, जुबेर अली ताबिश, जिया बागपती, हारून उस्मानी, एजाज शेख, अहद अमजद, नदीम मिर्ज़ा, फहीम कौसर, शकील कुरैशी आदी शायरांनी सहभाग नोंदवला. शकील हसरत, अनिल कोष्टी व जमील शेख यांनी उत्कृष्ट आयोजन केले.
